ऑनलाईन अर्ज भरणेपुर्वी अर्जदाराने घ्यावयाची दक्षता
१) ऑनलाईन अर्ज भरणे पुर्वी सदर वेब पेज वर अनुक्रमांक ८. वर उपलब्ध असलेली नोकरभरतीची विस्तृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. सदर जाहिरातीनुसार उमेदवाराने स्वतः पात्र असलेची खात्री करून ऑनलाईन फॉर्म भरणेत यावा.
२) ऑनलाईन फॉर्म भरणे पुर्वी ज्या पदासाठी फॉर्म भरायचा आहे त्यापदासाठी आवश्यक असलेले शुल्क बँकेच्या नजीकच्या शाखेत जाऊन शाखेत उपलब्ध असलेल्या चलनाद्वारे भरण्यात यावे. सदर चलनावर चलन क्रमांक दिलेला आहे . सदरचा चलन क्रमांक ऑनलाईन अर्जात लिहिणे आवश्यक आहे. चलन क्रमांक चुकीचा भरल्यास वा
न भरल्यास ऑनलाईन अर्ज रद्द समजण्यात येईल.
३) ज्या अर्जदारांना समांतर आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा आहे, त्यांनी ज्या वर्गातून सदरची सवलत मिळवायची आहे त्यासमोर खुण करणे गरजेचे आहे.
४) लेखी परीक्षेसाठी ९० गुण असून लेखी परीक्षेत बँकींग, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व नियम १९६१, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी इत्यादी विषयावर प्रश्न विचारले जातील.
५) लेखी परीक्षेसाठी उमेदवारास २ तासांचा कालावधी देण्यात येईल.
६) लेखी परीक्षेत किमान ४५ गुण मिळविणे आवश्यक आहे.
७) अंतिम निवड झालेल्या उमेदवाराचा परिविक्षाधीन कालावधी एक वर्षाचा राहील . सदर कालावधीतील उमेदवाराची वर्तणुक व कामकाज यांचा विचार करून सेवेत कायम करण्यात येईल.
८. नोकर भरती सविस्तर जाहिरात व परीक्षा शुल्क माहिती साठी येथे क्लिक करा --> CLICK
९. तांत्रिक कर्मचारी भरती जाहिराती करीता येथे क्लिक करा ---> CLICK