१) उमेदवाराने आपल्या अर्ज भरल्याची प्रत व परीक्षा शुल्क भरल्याची पावती स्वतः जवळ सांभाळून ठेवाव
२) संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरते वेळी, अर्ज भरण्यास तांत्रिक अडचण आल्यास +91 9156032598 हा हेल्पलाईन क्रमांक आहे, अर्ज भरण्यास अडचण निर्माण झाल्यास support@thanedccbank.com या मेल-आयडीवर ई-मेलव्दारे संपर्क साधावा. वरील हेल्पलाईन क्रमांक व मेल-आयडी फक्त काही तांत्रिक अडचणी (अर्ज भरते वेळी, मुलाखतपत्र डाउनलोड करते वेळी इत्यादी) निर्माण झाल्यास संपर्काकरिता आहे .
३) ऑनलाईन परिक्षा शुल्क संकेतस्थळावर अद्यावत केल्याशिवाय व पूर्ण फॉर्म भरल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही.
४) उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना त्यांनी शैक्षणिक पात्रता स्वतःच्या ईमेल आयडी मोबाईल क्रमांक व आधारकार्ड क्रमांक अचूक भरणे आवश्यक आहे.
६) प्रस्तुत पदांकरीता केवळ उक्त संकेतस्थळावरून ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरून विहित परिक्षा शुल्क भरलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे केलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाहीत
७) सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रियेच्या दरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेची माहितीबाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील